ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘२०२२ चा महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो जो दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेल्या ३० वर्षापासून निरुपण करत आहेत. तसेच अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या असून, आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही ते करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले.बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, स्मशान आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहीरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल

स्थापना :1995

पहिला पुरस्कार :1996 पू. ल. देशपांडे यांना साहित्य साठी दिला

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा खालील ८ क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :-

  1. आरोग्यसेवा
  2. उद्योग
  3. कला
  4. क्रीडा
  5. पत्रकारिता
  6. लोक प्रशासन
  7. विज्ञान
  8. समाजसेवा

पुरस्कारासाठी निकष कोणते असतात ?

सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरुप काय असते ?

पुरस्कार विजेत्याला ₹ 25 लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली. आता शिंदे सरकारने 10 लाख वरुण 25 लाख रुपये केले आहे .

महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ति ची यादी

वर्षनामक्षेत्र
१९९६पु. ल. देशपांडेसाहित्य
१९९७लता मंगेशकर कला, संगीत
१९९९विजय भाटकर विज्ञान
२००१सचिन तेंडूलकर खेल
२००२भीमसेन जोशी कला, संगीत
२००३अभय बंग और रानी बंगचिकित्सा कार्य
२००४बाबा आमटे समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकरविज्ञान
२००६रतन टाटा लोक प्रशासन
२००७र. कु. पाटील समाज सेवा
२००८नानासाहेब धर्माधिकारीसमाज सेवा
२००८मंगेश पाडगाँवकरसाहित्य
२००९सुलोचनदीदी कला, सिनेमा
२०१० जयंत नारलीकरविज्ञान
२०११अनिल काकोडकरविज्ञान
२०१५बलवंत मोरेश्वर पुरंदरेसाहित्य
२०२१आशा भोसले संगीत

Leave a Comment