आताची सर्वात मोठी बातमी शिंदे सरकार कोसळणार पाहा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं?


मित्रहो अनेक दिवसा पासुन शिंदे सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे १५ मार्च महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी राज्यपालांपासून ते बंडखोर आमदारांपर्यंत आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आमदारांचे पत्र हे बहुमत चाचणीसाठी पुरेसे कारण नाही. उर्वरित कारणांवर चर्चा करा, असे निर्देशच सरन्यायाधीशांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. आज राज्यपालांच्या वतीने महाअधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

तुषार मेहता यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते. मात्र, अशा पद्धतीने विश्वासमत मागणे लोकशाहीसाठी घातक आहे. 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.

जून महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरून पायउतार केल .

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

शिंदे-फडणवीस यांचं हे सरकार स्थापन होऊन ९ महिने पूर्ण झाले. या ९ महिन्याच्या कालावधीत राज्यात मोठी राजकीय ढवळाढवळ पाहायला मिळाली.

शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीपासूनच कामाचा सपाटा लावला होता. पण नंतरच्या काळात सरकारमधील मंत्री केवळ गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र यांच्यासारख्या कार्यक्रमांनाच फक्त हजेरी लावतात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती.

Leave a Comment