जुनी पेन्शन योजना नेमकी काय होती ?

जुनी पेन्शन योजना नेमकी काय होती जाणून घेऊ

  • जुनी पेन्शन योजने मध्ये कर्मचार्‍याच्या पगाराच्या अर्धी रक्कम 50% निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जाते असे
  • जुन्या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी तरतूद होती .
  • या योजनेत 20 लाख रुपयांपर्यंतची मॅच्युरिटी रक्कम उपलब्ध आहे.
  • जुन्या पेन्शन योजनेत पगार सरकारच्या तिजोरीतून केले जात असे .
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनची रक्कम मिळत असे
  • जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नव्हता .
  • सहा महिन्यांनंतर डीए (महागाई भत्ता) मिळण्याची तरतूद होती .


नवीन पेन्शन योजना काय आहे जाणून घेऊ

नवीन पेन्शन योजना ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे, त्यामुळे योजना पूर्णपणे सुरक्षित नाही.    

या नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या 50% या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 10% + कपात केली जाते.

रक्कम आगोदर गुंतवावी लागते.

या योजनेत निवृत्ती नंतर निश्चित पेन्शन ची कोणतीही हमी देण्यात येणार नाही.

ही योजना शेअर बाजार वर आधारित असल्याने, पेन्शन वर कर देखील भरावा लागतो .

नवीन पेन्शन योजनेत सहा महिन्यानंतर DA मिळण्याची कोणतीही तरतूद नाहिये .


जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली जाणून घेऊ

जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अधिक बोजा पडत असे. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांच्या पगारातून कोणतीही कपात होत नाही आणि संपूर्ण भार सरकारच्या तिजोरीवर टाकला जात असे . त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देताना सरकारच्या तिजोरीवर अधिक बोजा पडणारहे स्पष्टच आहे.
१ जानेवारी २००४ पासून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून सरकारी कामात नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अनिवार्य करण्यात अली होतीआहे . त्याच वेळी, १ मे २००९ पासून ते सर्व नागरिकांसाठी ऐच्छिक तत्त्वावर देखील लागू केली गेली आहे.जुनी पेन्शन योजना सर्वात प्रथम काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारने 31 ऑक्टोबर, 2005 रोजी बंद केली ,जुनी पेन्शन योजना बंद करण्यासाठी सुलतानी नावाचा GR काढण्यात आला होता. या शासन निर्णयात सरकारने शिक्षकांसहित सर्व कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला .

पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपले सगळे आयुष्य नोकरीत घालवायचे नंतर आपण या वयात कुठे काम करणार आहोत आणि काम मिळाले तरी पण वयाच्या साठीतही काम करावा लागनर आहे पण सरकारने ही जुनी पेन्शन योजना परत सुरू केली तर यांचे मातरपणात हाल होणार नाहीत . अशी गोष्ट असताना 31 ऑक्टोबर, 2005 रोजी शासनाने ही सर्वात बाब कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातून हिरावून घेतली. {जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र 2023}
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2005 साली ही योजना बंद केली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार सत्तेत राहिले होते. या कालावधीमध्ये या निर्णयाविरुद्ध एकही आंदोलन झाले नव्हते. त्यानंतर भाजप सरकार सत्तेत आल्यावर शिक्षक संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करायला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलचं तापलं आहे.
14 मार्च, 2023 पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या संपला संपूर्ण राज्यातून पाठिंबा आहे .

Leave a Comment